
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बिलोली तालुक्यातील मौजे गागलेगांव ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार जय मल्हार सेनेच्या वतीने करण्यात आला सरपंच पदाचे उमेदवार सौभाग्यवती उषाताई आनंदराव जिंके 121 मतांनी विजयी झाले असून 9 पैकी 6 उमेदवार विजयी झाले त्यात (1) पिराजी नागोराव कमळे (2) सरवर महेबुब शेख (3) गंगाबाई साहेबराव कामोले (4) हनमंत निवृत्ती डुमणे (5) गंगुबाई बालाजी सुर्यवंशी (6) शोभाबाई राम माशेटवार हे सर्व सदस्य विजयी झाले असून या सर्वांचा पुष्पहार शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले या वेळेस जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे, जय मल्हार सेना विधानसभा प्रमुख नबाजी वाघेकर जय मल्हार सेना युवा ता अध्यक्ष हणमंत मुदनकर राष्ट्रीय समाज पक्षाचे ता अध्यक्ष मोहन मुदनकर जय मल्हार सेना ता सरचीटनीस शंकर जिंकले साईनाथ प्यादेकर संदीप गोरले माधव धुळेकर व सर्व पदाधिकारी समाज बांधव गांवकरी मंडळी उपस्थित होते