
दैनिक चालू वार्ता कल्याण प्रतिनिधी –
अमत् फल महोत्सव समिती आयोजित (अमृत महोत्सव सत्कार सोहळा ‘यांनीही घडविला इतिहास’ या कार्यक्रमाचे आयोजन कल्याण, बुद्धभूमी फाऊंडेशन वालधूनी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहिणी जाधव तुपलोंढे असून, भंते गौतमरत्न महाथेरो यांनी धम्म देसना दिली.
आंबेडकरी चळवळीतील लेखिका ज्यांनी आपल्या लेखणीतून चळवळ उभी केली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. आपले जीवन आंबेडकरी चळवळीला समर्पित केले . त्यातील ज्येष्ठ साहित्यिका हिराताई बनसोडे, उर्मिलाताई पवार,हिरा दया पवार, उषाताई अंभोरे यांना अमत् फल महोत्सव समिती तर्फे सन्मानित करण्यात आले. तर त्यांच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंट्री फिल्म दाखविण्यात आली.
आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांना
पद्मश्री कल्पना सरोज यांनी मार्गदर्शन केले.
दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे. हे आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे. आपला इतिहास आपणच लिहायचा आहे.
आमच्या साहित्यात मानवता आहे.असे ज्येष्ठ साहित्यिका उर्मिलाताई पवार यांनी बोलताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन मला घडले. सोन्याचा स्पर्ष मला झाला. संस्थेच्या माध्यमातून आम्ही महिलांचे प्रबोधन केले. असे ज्येष्ठ साहित्यिका हिराताई बनसोडे यांनी बोलतांना सांगितले.
डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा, शिकवण आम्हाला मिळाली आहे. असे सांगत रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर यावेळी हिरा दया पवार यांनी कविता सादर केली.
आंबेडकरी चळवळी बद्दल चर्चा ज्येष्ठ साहित्यिका उषाताई अंभोरे यांनी केली.
नविन पिढीला प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाजा समोरील सध्याचे प्रश्र आवाहाने यासाठी सतर्क राहण्याचे रोहिणी जाधव तुपलोंढे यांनी संबोधित केले.
कवी संमेलनात कवी नवनाथ रणखांबे, कवी मिलिंद जाधव, नंदा नांद्रेकर, मनीषा मेश्राम, साक्षी डोळस यांनी प्रबोधनात्मक कविता सादर केल्या.सदर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. अलका पवार यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल शिंदे. ज्येष्ठ साहित्यिका प्रा. आशालता कांबळे, अँड.बी. जी. बनसोडे, अँड. मंजू खोब्रागडे,सिध्दार्थ मोरे,
प्रा. एकनाथ जाधव, अंजलीताई साळवे, अँड. धम्मकिरण चन्ने, डॉ. ग्रीष्म खोब्रागडे , डॉ.प्रदीप गांगुर्डे, विधाताई ऊके ,मंजू सिंग उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे संयोजक रोहिणी जाधव तुपलोंढे,डाँ.अनुप्रिया खोब्रागडे,डाँ.अलका पवार,
माधुरी सपकाळे,साक्षी डोळस,राजेद्र बाविस्कर
प्रताप माने, अँड.मंजु खोब्रागडे, शैलेश दोंदे, सिंधुताई रामटेके, डॉ. अभिषेक जाधव ,कुंदाताई निळे ,आशा तिरपुडे, नवीन गायकवाड, डॉ. विद्या शिर्के ,शरद लोखंडे, सुमन मधाळे, नूतन मोटघरे, प्रताप माने, मीरा वासणिक , सुरेखा पैठणे
उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधुरी शिंदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा पैठणे यांनी केले. तर चर्चासत्राचे सूत्रसंचालन अनुप्रिया खोब्रागडे यांनी केले. तर आभार अँड. सोनाली भगत यांनी केले.
यावेळी बुध्दभुमी फाऊंडेशन, कर्मवीर मधुकरदादा तुपलोढे प्रतिष्ठान, बौध्द विहार संघटना समन्वय समिती, समता संघर्ष संघटना, माता रमाई स्मारक झालेच पाहीजे समिती, पंचशील धम्म प्रबोधन महिला मंडळ, बौध्द विकास मंडळ यांचा साहभाग होता.