
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी: राम चिंतलवाड
हिमायतनगर प्रतिनिधी:-शासकीय आदीवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मौजे दुधड ता.हिमायतनगर जि.नांदेड येथील १७ वर्षे वयोगटातील शालेय मुलांनी जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश मिळवलेआहे.अंतिम सामना जिंकुन विभागीय स्पर्धेसाठी संघाची निवड झालेलीआहे.या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शासकीयआदिवाशी आश्रमशाळा मौजे दुधड येथील १७वर्ष वयोगटातील रामप्रसाद बुरकुले,श्याम मेश्राम,राहुल भुरके,प्रवीण गोरे, नागनाथ बुरकुले,ज्ञानेश्वर बोडके, सुशील खरवडे,ओमकार वानोळे, श्रावण बोरे,दत्ता बुरकुले,अविनाश वानोळे,ज्ञानेश्वर साखरे हे विद्यार्थी सहभागी होते.त्यांनी या कबड्डी स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांक पटका वीत घवघवीत यश संपादन केले आहे.यामुळे त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.असगरअली जिल्हा क्रीडा संयोजक अधिकारी नांदेड यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे तोंडभरून कौतुक केलेआहे.यासाठी कठोर परिश्रम घेणारे खेळाडू,क्रीडा शिक्षक श्री सोनटक्के सर,आरोग्य व पोषण आहार विशेषक दिनेश निकम सर,मार्गदर्शन एस.के. चव्हाण,सहकार्य करणारे सर्व शिक्षक आणि प्रेरणा देणारे प्राचार्य श्री प्रल्हाद चामे सर यासह सर्वांचे कबड्डीपटू विद्यार्थ्याचे विविधस्तरावरून हार्दिक अभिनंदन करण्यात येतआहे.