
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी शहरात भूमाफीयांनी आपले बस्तान झपाट्यात बसवले आहे.आकोट,परतवाडा,अमरावती येथील भुमाफियांनी स्थानिक मंडळींना हाताशी धरून अनधिकृत लेआऊट चा धंदा चालू केला आहे,अश्यातच अंजनगाव सुर्जी शहरालगत नगरपरिषदेच्या हद्दीत तसेच ग्रामिण क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या शेतजमिनी लेआऊट धारक अधिकृत एनए लेआऊट न करता सर्रास विक्री सुरू असल्याने सामान्य व्यक्तीची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहिती अशी की, लेआऊट धारक व्यवसायिक शहरा लगत शेतजमिनी विकत घेऊन भोळ्याभाबड्या नागरिकांना दलाला मार्फत प्लॉट विकत असल्याचे दिसून येत आहे.लेआऊट एनए ची अधिकृत परवानगी न घेता हा करोडो रुपयांचा कारोबार अंजनगाव सुर्जी शहरात चालू आहे.मात्र,संबंधित अधिकारी गप्प का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.लेआऊट धारक कोणत्याही प्लॉट मध्ये सुविधा न करता नगराला नाव देऊन लेआऊट मध्ये चुन्याच्या पट्ट्या मारून,खाजगी मोजणीचे प्लॉट खुणे करिता दगड लावल्या जाऊन तसेच खासगी इंजिनिअरकडून नकाशे तयार करून शहरा लगत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबरवर ग्रामसेवकांनी नमुना नंबर आठ देऊन या घोटाळ्याला खतपाणी घालत असल्याने सर्वसामान्य नागरीकांची फसवणूक होत असुन जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
—————————————-
सामान्य जनतेची कशी होते फसवणूक
दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टी झाली म्हणजे प्लॉट धारकाला वाटते आता आपण मालक झालो.अशा भ्रमात प्लॉट धारक राहतो.मात्र;एनए लेआऊट शिवाय राष्ट्रीयकृत बँक कर्ज देत नाही…तेव्हा प्लॉट खरेदी करणारे बुचकळ्यात पडतात.तोपर्यंत लेआऊट धारक हात झटकतो व प्लॉट धारकांना धमकावून सांगतो की,तुम्हाला रजिस्टी करून दिली आहे तुम्ही घर बांधकाम करू शकता.तुमचे घर कोणी पाडू शकत नाही.अशी समजूत करून अनधिकृत लेआऊट धारक पैसे घेऊन मोकळा होतो.
—————————————-
—————————————-
अगोदर स्थगिती नंतर परवानगी
अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनधिकृत लेआऊट चा प्रकार २०१८ ते २०२० या कालावधीत उघड झाला होता.त्या प्रकरणात एका वरिष्ठ अधिकाऱ्याला निलंबित सुद्धा करण्यात आले होते.अनधिकृत लेआऊटला विक्रीस स्थगिती सुद्धा देण्यात आली होती.पुन्हा त्याच प्रकरणातील लेआऊटची परवानगी राजस्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियम धाब्यावर बसवून पुनश्च प्रदान करण्यात आले आहे.लेआऊट परवानगी देण्यापूर्वी भुखंडामध्ये पथदिवे,सुशोभीकरण,नाल्या,रस्ते इत्यादी सुविधा देणे अत्यंत आवश्यक आहे.मात्र;असल्या कोणत्याही सुविधा नसताना नियमांचे उल्लंघन करूनत लेआऊट ला परवानगी दिल्याची आजुबाजुच्या शेतकयांत चर्चा आहे.या सर्व प्रकारात काही अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याची चर्चा सुद्धा शहरात आहे.जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
—————————————-
—————————————-
आयकर विभागाचे दुर्लक्ष
लेआऊट व्यवसायात मोठ-मोठी मंडळी यात सहभागी असून काही प्रतिष्ठित डॉक्टर,काही अधिकारी,व्यावसायिक सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याच्या उद्देशाने सहभागी असून गाव तथा शहराजवळील रोड लगत जमिनी विकत घेत असून त्यामध्ये प्लॉट काढून विक्री केल्या जात आहे.बाजारभावाने असलेली कोट्यावधी रुपयाची जमीन शासकीय भावाने खरेदी केल्या जाते.यामध्ये पद्धतशीरपणे झालेला व्यवहार लपविल्या जात असल्याची जोरदार शहरात चर्चा शहरात असून या लेआऊट धंद्यातील मालामाल झालेले व्यवसायिक हे अधिकाऱ्यांना मात्र पद्धतशीरपने खुश करतात आणि आपले काम मार्गी लावत असल्याचे बोलल्या जात आहे.