
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:मगठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव २९ डिसेंबर २०२२ बीटस्तरीय विद्यार्थी-पालक-शिक्षक शिक्षण मेळावा व सेवापुर्ती कार्यक्रम खालील सर्व मान्यवर अधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वन्नाळी ता. देगलूर जिल्हा नांदेड या शाळेत दि.२९.१२.२०२२ रोज गुरुवार रोजी दुपारी १२.३० वाजता मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव २०२२ निमित्ताने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची भूमिका व कर्तव्य या करिता ग्रामिण भागात शिक्षणाचे महत्व व जनजागृती निर्माण होण्यासाठी बीटस्तरीय विद्यार्थी-पालक-शिक्षक यांचा शिक्षण मेळावा व वन्नाळी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक श्री धनंजय गंगाधरराव पोतदार यांचा सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मागील दीड ते दोन वर्षाच्या काळात कोरोना या महामारी साथीच्या रोगाने संपूर्ण देशाला पछाडले होते. यातून देशवासीयांच्या मोठ्या इच्छाशक्तीने सर्व देशवासीय सावरलो. परंतु या रोगामुळे विद्यार्थी शाळेपासून व अभ्यासापासून कोसोमैल दूर गेल्याचे दिसून येत आहे. शिक्षणासंबंधी उदासिनता व शिक्षणात आलेली मरगळता झिडकारून अभ्यासाला लागावी, विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाऊ नये, अभ्यासात गोडी लागावी वाचनाचा छंद जोपासावा. ” वाचल्याशिवाय वाचू शकत नाही.” हे विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवावे यासाठी विविध विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी यांना एकत्र बोलावून शिक्षणासंबंधी चिंतन व्हावे व त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून हा विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा शिक्षण मेळावा घेण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी नांदेड जिल्हातील व इतर जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग विद्यार्थ्यां समोर एक अनमोल आदर्श असतील. पालकांचे व विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार व्हावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी
कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब (पोलीस अधिक्षक, जिल्हा नांदेड)
स्वागत अध्यक्ष
मा. सौ. चंद्राबाई सायन्ना दोसलवार (सरपंच ग्रा.पं.वन्नाळी)
कार्यक्रमाचे उद्घाटक : मा. श्री. जसविंदरसिंग गुरूपिता सितासिंग (चौधरी) बाबाजी
कार्यअध्यक्ष : मा. श्री. बस्वराज पाटील बन्नाळीकर (मा.सदस्य शिक्षण व क्रिडा जि.प.नांदेड)
प्रमुख वक्ते
प्रमुख उपस्थिती
मा. माजी प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे लातूर (महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत) |प्रमुख उपस्थिती
मा.आ. जितेश रावसाहेब अंतापूरकर(आमदार देगलूर – बिलोली विधानसभा मतदार संघ ). आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी देगलूर व बिलोली तालुक्यातील सर्व जनतेने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची लाभ घ्यावा असे वन्नाळी चे बसवराज पाटील व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती वन्नाळी, उपसरपंच व सदस्य ग्रामपंचायत वन्नाळी, चेअरमन व सदस्य सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी वन्नाळी तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद नरंगल (बीट) ता. देगलूर जि. नांदेड यांनी आव्हान केले आहे.