
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील आरसोली येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना इ- केवायसी करणे शिबिर संपन्न झाले.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतराव फुले जन आरोग्य राज्य आरोग्य हमी सोसायटी महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशानुसार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी शेवटच्या घटकापर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी आरसोली येथे दिनांक २७ व २८ रोजी उपचारासाठी लागणारे आयुष्यमान कार्ड इ-केवायसी करणे शिबिर ठेवण्यात आले होते. गावातील १२८कुटुंबांना घरोघरी जाऊन इ- केवायसी करून देण्यात आले आहे.
या योजनेद्वारे पिवळे, केशरी, अंत्योदय ,अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांना लाभ देण्यात येणार आहे . विविध आजारावर या योजनेद्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहे.
घरोघरी जाऊन इ- केवायसी करण्यात आल्यामुळे नागरिकांना याचा मोठा फायदा झालेला आहे. यासाठी जिल्हा समन्वयक डॉ.विजय भुतेकर , जिल्हाप्रमुख एकनाथ जाधव, सुपरवायझर सचिन यादव , आरोग्य मित्र धनाजी मोराळे , सूर्यकांत पाटील, सागर पवार , बालाजी लांडगे , अमृत लोंढे , प्रवीण सानप , संतोष दराडे , बाळासाहेब भांगे , आशा कार्यकर्ती तनुजा चंदनशिवे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी प्रा राम चंदनशिवे, भाऊसाहेब कुलकर्णी, पत्रकार रोहित चंदनशिवे , अनुरथ चंदनशिवे, श्रीराम चंदनशिवे, बापूसाहेब मुंडेकर, सुहास खराडे उपस्थित होते.