
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे .
दि 27 डिसें पुणे स्टेशन पुणे
व्हिएतनाम भन्ते हान्ह् व भिक्खुनी किम थोवा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पुणे स्टेशन याठीकाणी धम्म जागृती विशेष बैठक आयोजीत करण्यात आली. येणाऱ्या काळात जागतिक बौद्ध धम्म परिषद व आंतरराष्ट्रीय बौद्ध सलोखा निर्माण व्हावा आणी तो वाढवा याकरिता विविध कार्यावरती चर्चा करण्यात आली. तसेच तेथील गरजू गरीब लोकांना अन्नधान्य व प्रत्येकी 1000 रुपये दान करण्यात आले.
याप्रसंगी झेन मास्टर सुदस्सन, कोब्राराजे एडवोकेट भाई विवेक चव्हाण, प्रज्ञा मॅडम, करिअप्पा कपूर, व्यंकटेश मरकळ आदी मान्यवर उपस्थित होते.