
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- पालाच्या झोपडीत (तंबूत) राहून शहरी आणि ग्रामीण नागरिकांना घरे बांधण्याकरिता मिळणाऱ्या अनुदानातील तफावत दूर करण्यासाठी आमदार बच्चू कडू हे आंदोलन करणार आहेत.विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला झोपडीतच राहून ते अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत.
आ.बच्चू कडू म्हणाले की,ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी शासन घरकुल योजनेत केवळ १.१८ लाख रुपये देते तर शहरात हीच रक्कम २.६७ लाख रुपये म्हणजे दुप्पट आहे.आ.बच्चू कडू यांनी गावात घरे बांधण्यासाठी शहरा इतकीच रक्कम मिळावी या मागणीसाठी झोपडीत (तंबूत) राहून अनोख्या आंदोलनाची घोषणा केली.ते आपल्या कुटुंबासह तंबूत राहणार आहे.त्यांच्यासह अनेक इच्छुक उमेदवारही आंदोलनात सहभागी होत आहेत.
चौकट
—————————————-
*कडक नियम व अटी काढा*
बच्चू कडू यांनी गृहनिर्माण अनुदानासाठी २० प्रकारच्या अटींवरही आक्षेप घेतला आहे.अटी काढून टाकण्याची मागणी करून ते म्हणाले की,देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली आहेत.लोकांना अन्नधान्य,कपडे,घर मिळाले पाहिजे.आमदार,खासदार,बिल्डरकडे प्रत्येकी दहा घरे असल्याकडेही कडू यांनी लक्ष वेधले.त्यांनी आपल्या आंदोलनाला सरकारविरोधी म्हणण्यास नकार दिला.शिंदे सरकारला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.पण याचा अर्थ ते सरकारच्या विरोधात आहेत असे नाही.अधिवेशनाचे दिवसभराचे कामकाज संपवून उद्या, २८ डिसेंबर रोजी झोपडीत (तंबूत) राहायला जाणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी सांगितले.त्यांच्यासोबत सामान्य नागरिक तसेच शेकडो कार्यकर्ते सुद्धा मंडपात राहणार आहेत.