
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृती बंधांनुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता. २७) नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर संगणक परिचालकांचा मोर्चा धडकणार आहे.
याबाबत संगणक परिचालकांतर्फे गटविकास अधिकारी बाबासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफी योजना, प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत कुटुंबांचा सर्वेक्षण संगणक परिचालकांनी केला आहे. तसेच अनेक प्रकारचे कामे प्रामाणिकपणे करून सुद्धा तुटपुंजे मानधन दिले जाते. राज्यातील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत सुधारित आकृतिबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन द्यावे या मागणी साठी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनावर मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या निवेदनात नमूद केलेले आहे.
यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत कव्हळे, उपाध्यक्ष प्रदीप चोरमारे, सचिव अब्दुल शेख, मोहन राठोड, गणपत घारे, बाळासाहेब इंगळे, अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती. संघटनेच्या वतीने आमदार बबनराव लोणीकर यांनाही निवेदन सादर करण्यात आले.