
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे शहर- संभाजी पुरीगोसावी.
पुणे शहरांमध्ये वर्षाच्या सरतेशेवटी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. चतु:र्शिंगी परिसरामध्ये अल्पवयीन मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुणे शहर चांगलेच हादरले. आधी चाकूचा धाक दाखवून या मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्यांची धमकी देवुन सहा आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी चतु:र्शिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला. यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली. पुण्यात रोज अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यांचे चित्र दिसून येत आहे. पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध उद्योजकांने ॲडिशन घेण्यांच्या बहाण्यांने करुन १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरांतील सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे या नरधमांचा शेवट कधी होणार ?असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित होत आहे.