
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी-शहाबाज मुजावर.
शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी मलकापूर नगरपरिषदेला ५ कोटी व पन्हाळा नगरपरिषदेला ५ कोटी असा एकूण १० कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती पन्हाळा नगर परिषदेची मुख्यअधिकारी चेतन माळवी व कर प्रशासकीय अधिकारी अमित माने यांनी आज माहिती पत्रकार परिषद ला दिली आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे त्यांच्या पाठपुराला यश आले आहे. असे त्यांनी सांगितले
पन्हाळा नगरपरिषद क्षेत्रातील कामे.
पन्हाळा (ता.पन्हाळा) येथे सि.स.नं.०६ मध्ये पर्यटक निवास व बहुउदेशीय हॉल बांधणे – ३ कोटी पावनगड (ता.पन्हाळा) येथील हणमंत दरवाजा पुनर्बाधणी करणे – २ कोटी
मलकापूर नगरपरिषद क्षेत्रातील कामे..
मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील जुने मंगलधाम येथे शॉपिंग सेंटर बांधणे – ३ कोटी मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील जुनी नगरपालिका येथे शॉपिंग सेंटर बांधणे – २ कोटी