
दैनिक चालू वार्ता अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी -बालाजी देशमुख
अंबाजोगाई जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद बीड व सुमतीबाई गुणाले शिक्षण प्रसारक मंडळ धानोरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग शाळेतील व कर्म शाळेतील मुला मुलींच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 9 जानेवारी2023 व 10 जानेवारी2023 दरम्यान अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे
शासकीय अनुदानित विनाअनुदानित व कायमस्वरूपी विना अनुदानित दिव्यांगाच्या विशेष शाळा शाळा मधील दिव्यांग विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांच्यातील क्रीडा गुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात सहभागी घेण्याची संधी मिळावी या उद्देशाने दरवर्षी दिव्यांग मुला मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा चे आयोजन जिल्हा समाज कल्याण विभाग बीड च्या वतीने करण्यात येते. जिल्हा क्रीडा स्पर्धेमधून पहिले येणारे विद्यार्थी हे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतात व जिल्ह्याचे नेतृत्व करतात या दिव्यांग क्रीडा स्पर्धेमध्ये अंध मतिमंद अस्तिव्यंग कर्णबधीर व बहु विकलांग प्रवर्गातील वय वर्ष 8 ते 25 वर्षाखालील मुले मुली हे सहभाग घेणार आहेत या स्पर्धेमध्ये 50 मीटर 100 मीटर 200 मीटर व पाचशे मीटर धावणे लांब उडी गोळा फेक स्पोर्ट जंप व संस्कृती कार्यक्रम इत्यादी प्रकारचे खेळ घेण्यात येणार आहेत.
या क्रीडा स्पर्धा अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक 9/1 2023 रोजी सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहेत या स्पर्धेचे उद्घाटन बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्पर्धेसाठी आष्टी गेवराई पाटोदा माजलगाव बीड धारूर परळी व अंबाजोगाई तालुक्यातील दिव्यांग शाळेतील विद्यार्थी सहभाग घेणार आहेत दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा यांनी मार्गदर्शन यामध्ये दिलेल्या सूचनानुसार या स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड ही जानेवारी 2023 मध्ये बालेवाडी पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार आहे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी हे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत अशी माहिती बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री शिंदे साहेब व वै सा का श्री नकाते साहेब यांनी दिली आहे