
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
श्री साहेबराव नंदन व ललित साळवे यांना बहुचर्चित पुष्प रत्न साहित्य समूहाचा राज्यस्तरीय ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्रदाण
२०२३ ह्या नववर्षाच्या सांज संध्येला ज्ञानवंत गुणवंत यांच्या उपस्थितीत काव्याच्या बहारदार मैफीलीत साग्रसंगीत निवेदीतात समुहाचे प्रर्वतक अध्यक्ष मा . आनंदजी आहिरे यांच्या पुढाकारातून मा . ॲड बापूसाहेब संभाजीराव पगारे सौ . पुष्पलताताई पगारे यांच्या अध्यक्षते खाली शुभ हस्ते मा . श्री साहेबराव आनंदराव नंदन सह ललित सुधाकर साळवे दोन्ही ताहाराबादकर ता . बागलाण जि नाशिक ह . मु नाशिक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकाशित झालेल्या सगरवंशिय जिरे माळी समाजाच्या व्यासपिठावरील नावारूपास आलेल्या व सर्वच स्तरात मानाचे स्थान पटकावलेल्या ” सगर रत्न विशेषांक भाग एक ” ह्याची दखल घेत मा . आनंदजी आहिरे यांनी प्रोत्साहन गौरव पर मानाचे सन्मानपत्र तेही फोटो फ्रेम सह [ मोठे ] शॉल श्रीफळ ट्रॉफी मेडल देऊन सन्मानित केले ते उभयंता पगारे दांम्पत्याच्या हस्ते . ह्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून दिग्गज ६० कवी कवयत्रि मान्यवर उपस्थित होते . सर्वच मान्यवरांनी ह्या पुरस्कारार्थी सर्वच साहित्यिक बंधूच्या साहित्याचा गौरव केला . उत्तर महाराष्ट्रच नव्हे ‘ तर महाराष्ट्राला भूषणावह बाब आहे . सगर रत्न विशेषांकाचे संपादक लेखक हे ग्रामिण असून देखिल त्यांच्या साहित्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उच्च विद्याविभूषित लोक असतात . त्यांनी सगर रत्न विशेषांक पाठोपाठ स्वःताचा ” गावगाडा ” काय संग्रह ‘ सगर दिपोत्सव दिवाळी अंक देखिल प्रकाशित केला आहे . त्यांना आत्ता पर्यंत कविता क्षेत्रातले ऑनलाईन ३०० च्या पुढे सन्मान पत्र प्राप्त झाली आहेत . तसेच ऑफ लाईन मानाचे मोठं मोठे सन्मान सोहळे पुरस्कार देखिल मिळाले आहेत . श्री साहेबराव नंदन म्हणंजे खान्देश वासियांना व सगर समाज बांधव साहित्य विश्वाला लाभलेले एक कोंदन आहे . ह्या कोंदणाच्या सानिध्यात जो ही येतो अडकतो त्याचा हिराच होतो . अल्पशिक्षित परंतू साहित्यात खुपच नाव आहे अशा शारदापुत्र श्री साहेबरावजी नंदन यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे .