
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:पुण्यातील वकिलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना घडली असून आरोपीस पुणे (वाकड) पोलिसांच्या सांगण्यावरून भक्तापूर (ता. देगलूर) येथे देगलूर पोलिसांनी पेट्रोल टाकून जाळल्याचा प्रकार उघडकीस आला
अटक केली. वकिलाचा मृतदेहआहे. अॅड. शिवशंकर शिंदे हे लातूर जिल्ह्यातील भादा ( ता. औसा) या गावचे मूळ रहिवासी असून ते गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील काठेवाडी भागात राहात होते. ते पुण्यातील नामांकित वकील होते. आरोपी राजेश्वर जाधव (भक्तापूर, ता. देगलूर) सध्याअकाऊंटंट म्हणून काम करत होता. जाधव याची पत्नी वकील असून ती अॅड. शिंदे यांच्यासमवेत वकिलीची प्रॅक्टिस करीत होती. त्यामुळे तिचे व मयत वकिलाचे अनैतिक संबंध आहेत, असा संशय आरोपी राजेश्वर जाधव यास होता. आरोपी राजेश्वर जाधव याने ३१ डिसेंबर २०२२ रोजी शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना टेम्पो क्रमांक एमएच १४ केए ८११६ टाकून तो पुणे येथून निघाला. दरम्यान, मयत वकिलाची पत्नी रमण शिवशंकर शिंदे यांनी वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी जाधव याचा मोबाईल ट्रेस केल्यानंतर आरोपी देगलूर तालुक्यातील भक्तापूर येथे असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी देगलूर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. सोमवारी सकाळी डीबी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक आनंद माळाळे, जमादार कृष्णा तलवारे, पो. कॉ. संजय यमलवाड यांनी राजेश्वर जाधव यास भक्तापूर येथे अटक केली. अॅड. शिंदेंचा मृतदेह कोटचिर (तेलंगणा) महादेव मंदिर परिसरातील खदानीत जाळून टाकल्याचे आरोपी राजेश्वर जाधवने पोलिसांना सांगितले. देगलूर पोलिसांनी आरोपीस मदनूर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले. दरम्यान, पुणे (वाकड) येथील पोलिसांचे पथक सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मदनूर येथे दाखल झाले आहे.. आरोपीने वकिलाचा खून कसा व कुठे केला हे पोलिसांच्या तपासाअंती स्पष्ट होणार आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन मंगळवारी सकाळी मदनूर येथे केले जाणार आहे, अशी माहिती पुणे वाकड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी हरीश माने यांनी सांगितले.