
दैनिक चालू वार्ता सावरगाव प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
– क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त सरपंच सौ सुवर्णा मंगेश पाटील यांनी विनम्र अभिवादन केलं. क्रांतिज्योति सावित्रीबाई सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. स्त्री शिक्षणासाठीचं त्याचं योगदान चिरंतन आहे. प्रत्येकाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन सरपंच सौ सुवर्णा मंगेश पाटील यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी उपसरपंच सौ धोंडुबाई गणेश पाटील क्षीरसागर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अंनता टोकलवाड मंगेश पाटील क्षीरसागर, गणेश पाटील क्षीरसागर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील क्षीरसागर, शहाजी पाटील क्षीरसागर ,जगन पाटील, दिपक पाटील,अविनाश पाटील आदी गावांतील मंडळी उपस्थित होती