दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनीधी – कवि सरकार .इंगळी
गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे गेल्या दहा वर्षांपासून देण्यात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कविता संग्रहाना दरवर्षी स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदा गिरणा गौरव प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कारासाठी विविध कवी,कवयित्री समवेत कवी,प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे यांच्या स्वलिखित जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहास पुरस्कार जाहीर झाला आहे.
कवी प्रा. डॉ. आनंद रत्नाकर अहिरे हे परिवर्तनवादी सुप्रसिद्ध कवी, लेखक, शैक्षणिक, सामाजिक चळवळीत कार्य करणारे उच्चविद्याविभूषित पुष्परत्न जागतिक समुहाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद चे असून आजीवन सदस्य, विश्व मराठी साहित्य परिषद चे आहेत, संपुर्ण राज्यभरात २८शाखा असलेल्या प्रसिद्ध “आहिरे स्पर्धा परिक्षा अकादमी “चे संचालक होय.त्यांच्या साहित्यिक,सामाजिक, शैक्षणिक,राजकीय कार्यात मोठे योगदान आहे.ते विविध पदावर कार्यरत आहेत.
भारतभूषण प्रा. डॉ.आनंद रत्नाकर आहिरे
प्राध्यापक,कवी,लेखक,वक्ता, मार्गदर्शक,
नाशिक जिल्हा नाशिक .त्यांचे शिक्षण एम.ए.(मराठी),बी.एड.,नेट
(जेआरएफ),पी.एच.डी.
डी.लिट.(अमेरिका),टी.वाय.बि.ए._सुवर्णपदक,द्वितिय क्रमांक मुंबई विद्यापीठ
एम. ए.प्रथम क्रमांक, आर. के. तलरेजा महाविद्यालय, उ.नगर_२०१०
यूजीसी/नेट परीक्षा (मराठी) प्रथम क्रमांक महाराष्ट्र _२०१०
वर्ल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, थायलंड येथे नोंद,२०१८
एशिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली येथे नोंद_२०१९
रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड :-2022:- नाशिक
सन २०१०ते२०२२पर्यंत ९६ आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राज्य पुरस्काराने सन्मानित,त्यांनी विविध पदे भूषवलेली आहेत.
संचालक:-आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी,संपूर्ण महाराष्ट्रात नाशिक, मुंबई, पुणे येथे शाखा आहेत.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद
राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी,जागतिक मानवाधिकार लोकपरिषद
आजीवन सदस्य,विश्व मराठी साहित्य परिषद
अध्यक्ष ,पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुंबई
अध्यक्ष ,पुष्परत्न साहित्य समुह,जागतिक कवी व साहित्यिकांचे हक्काचे विचारपीठ
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष,पदवीधर संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षों ,त्यांचे
शैक्षणिक कार्य
आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे माध्यमातून१६हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
१३९४विद्यार्थी विविध विषयात यूजीसी/नेट परीक्षा उत्तीर्ण
२५० च्या वरती विद्यार्थी पोलिस/आर्मी भरती उत्तीर्ण
१००च्यावर विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्तीर्ण
२१९ च्यावर विद्यार्थी फक्त मराठी विषयात युजीसी_नेट/सेट/जेआरएफ उत्तीर्ण
सन २००८ ते २०२२पर्यंत ७६ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन ,साहित्य क्षेत्रात त्यांचे
साहित्यिक कार्य
दुबई येथे विश्व मराठी कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड, दि.12 ते 16 ऑक्टोबर 2022
सन२०१०ते२०२२पर्यंत ४५च्यावर साहित्य संमेलने,कविसंमेलनाचे आयोजन,अनेक साहित्य संमेलन, कविसंमेलनला,उद्घाटक,स्वागताध्यक्ष,अध्यक्ष,आयोजक,प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित.
प्रत्येक महिन्याच्या आद्य रविवारी पुष्परत्न साहित्य समुह चे वतीने कविसंमेलन, साहित्य संमेलन व गुणगौरव सोहळा अहिरे अकॅडमी,नाशिक येथे आयोजित करणे.आतापर्यंत 45 च्या वरती कविसंमेलन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केलेले आहेत.याअगोदर जगायचं राहूनच गेलं या कवितासंग्रहास महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार 2022 धुळे येथे सन्मानपूर्वक बहाल झालेला आहे.
आजपावेतो सरांचे पुस्तके प्रकाशित
जानू तुझ्याच साठी (कवितासंग्रह ):-कल्याण
नेट /सेट /जेआरएफ पेपर 2, मराठी:-दिल्ली
जगायचं राहूनच गेलं (कवितासंग्रह ):-नाशिक
महापुरुषांच्या वाटेवर (वैचारिक लेखसंग्रह ):-दुबई
डोळ्यसमोरच्या कथा (कथा संग्रह ):-नाशिक
मास्तरांना घडवणारा मास्तर (आत्मकथन ):-लवकरच प्रकाशित होणार आहे.
सामाजिक कार्य
गरजू ,दिव्यांग,मेरिटमधील विद्यार्थ्यांना आहीरे अकॅडमी मध्ये मोफत मार्गदर्शन
वृध्दाश्रमास विविध पध्दतीने सहकार्य,संपुर्ण महाराष्ट्रातील डोंगर, दऱ्या, खोऱ्यात, खेडोपाडी राहणाऱ्या ७६हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा करिअर मार्गदर्शन,गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन,विविध ठिकाणी जयंती, पुण्यतिथी, विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे.
परिवर्तनवादी सुप्रसिद्ध कवी, लेखक, शैक्षणिक, सामाजिक चळवळीत कार्य करणारे व साहित्य क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांच्या जगायचं राहूनच गेलं या कविता संग्रहास स्मिता पाटील शब्द पेरा पुरस्कार शेकोटी साहित्य संमेलनास विविध मान्यवरांच्या शुभ हस्ते दि.15 जानेवारी 2023 रोजी कमलाकर आबा देसले साहित्य नगरी भावबंधन मंगल कार्यालय नाशिक येथे सन्मान पूर्वक बहाल होणार आहे.त्यांनी आयोजक गिरणा गौरव प्रतिष्ठान अध्यक्ष, मा. सुरेश पवार यांचे खूप खूप धन्यवाद मानले.
संपूर्ण महाराष्ट्र मधून कवी प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.


