दैनिक चालु वार्ता अहमदपूर प्रतिनीधी –
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे धसवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित अभिलेख कचर्यात जमा असलेल्या अवस्थेत आढळले ,याबाबत अधिक माहिती अशी की श्री परमेश्वर श्यामराव पोले यांनी ग्रामपंचायत कडे त्यांच्या आजोबांचे मृत्यू प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांना संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक श्री चात्रे यांनी ग्रामपंचायतीच्या अभिलेखाची चाचपणी न करता संबंधित व्यक्तिला तुमच्या आजोबांची नोंद नसल्या कारणात्सव मृत्यू प्रमाणपत्र देता येणार नाही त्याकरीत्ता तुम्ही न्यायालयात जावे असा सल्ला दिला .परंतु ग्रामपंचायतीचे अभिलेख पाहण्याचे कष्ट त्यांनी घेतले नाहीत ,असा आरोप श्री पोले यांनी केला .ग्रामपंचायत प्रशासनाला तळमळीने अभिलेखाचा शोध घेण्याची विनंती केल्यानंतर ग्रामपंचायत सेवक श्री सर्जेराव सोगेवाड आणि श्री पोले हे अभिलेखाची पाहणी करण्याकरिता ग्राम पंचायतीच्या जुन्या इमारतीत पाहणी करत असताना संपूर्ण अभिलेख हे पावसाने भिजलेल्या अवस्थेत आढळून आले. यासंबधी सेवकास विचारणा केली असतं गेल्या पाच वर्षापासून हे या अवस्थेत असल्याचे त्यांनी संगितले . पाच वर्षापूर्वी ग्राम पंचायत कार्यालय हे सार्वजनिक सभागृहात स्थलांतरित झाले असून अभिलेख मात्र जुन्या गळक्या इमारतीत मुद्दामहून ठेवण्यात आले असल्याचा आरोप श्री परमेश्वर पोले यांनी केला .संबंधित प्रकरण हे खूप संवेदनशील असून नागरिकांच्या सार्वजनिक अभिलेख त्यात जन्म मृत्यू उतारा ,जॉब कार्ड रेकॉर्ड ,घरकुल योजनेसंबंधित अभिलेख,तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील इतर महत्वाचे अभिलेख पावसाने भिजून हे कचर्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले असून प्रशासकीय अधिकार्यानी या बाबींना गांभिर्यापूर्वक न घेता सार्वजनिक अभिलेख अधिनियमाला केराची टोपली दाखवली आहे,तसेच गायरान जमिनी शासनाच्या परस्पर काही लोकांच्या नावे करण्यात आल्या असल्याचा आरोप देखील श्री पोले परमेश्वर यांनी केला आहे .त्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या संबंधित अभिलेख माहितीच्या अधिकाराखाली मागणी केली होती तेव्हा अभिलेख कार्यालयात उपलब्ध नसल्याचे लेखी कळविण्याचे धाडस याच प्रशासनाने केले होते ,परंतु आज केलेल्या पाहणीत संबंधित अभिलेख कचर्यात आढळून आले आहेत . नागरीकांच्या सोयीकरिता निर्माण केलेल्या कायद्याला आम्ही पायाखाली तुडवू ,वाटेल ते उत्तरे देऊ आणि गरज पडली तर अभिलेखाची विल्हेवाट लावू अशी धारणा धरून काम चालू असल्याचे निदर्शनास आले आहे .तरी संबधित प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी ,कर्मचारी वर्गावर नियमांनुसार कार्यावही करण्याचे आवाहन परमेश्वर पोले आणि गावातील सुज्ञ नागरिकांनी गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केले आहे .


