दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा. तालुक्यातील
हेलस येथे माँसाहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जन्मोत्सवा निमित्त ८ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ३० पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जाण ठेवली हे शिबिराचे ४ थे वर्ष आहे.यावेळी मंठा येथील नगरसेवक प्रदीप भाऊ बोराडे यांनी कार्यक्रमाचे उद्दघाटन केले यावेळी बोराडे हेल्थ क्लब चे संचालक संजू भाऊ बोराडे, हेलस गावाचे सरपंच नामदेव भाऊ बनसोडे, उपसरपंच सोपान काका खराबे सर्व ग्रामपंचायत सदस्य व जनकल्याण रक्तपेढी जालना यांची सर्व टीम व गावातील सर्व तरुण मित्रमंडळ यांनी रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.


