दैनिक चालू वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी -विष्णू पोले
प्रधानमंत्री पीकविमा योजना ही मुख्यत्वे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी केंद्रीय सरकारने चालू होती ,परंतु या योजनेचा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त फायदा झाल्याचे निष्पन्न होताना दिसून येत आहे.मुळात ही योजनाच कंपनीच्या फायद्याची असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.देशात सत्ताबदल झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना जाहीर केली होती 2014 साली या योजनेला शेतकऱ्यांनी जो प्रतिसाद दिला तो प्रतिसाद वर्षानुवर्षे कमी होताना दिसून येत आहे.पीकविमा कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्गाला या योजनेचा फायदा पोहचता दिसत नसून ,कंपनीने घातलेल्या जाचक अटी मुळे शेतकरी या योजनेत अपात्र ठरत आहेत तर काही अंशी कंपनीचं अपात्र ठरविण्यात जास्त रस घेताना दिसते.
अहमदपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे दावे हे कंपनीने मंजूर केले असून आजवर त्यांच्या खात्यावर पिकविण्याची रक्कम जमा झाली नाही .त्यामुळे नेमकी काय अडचण आहे हे मात्र समजण्या पलीकडचे धोरण आहे.AIC OF INDIA ही पीकविमा कंपनी लातूर जिल्ह्यासाठी पीकविमा क्षेत्रात कार्यरत असून कंपनीच्या प्रतिनिधी,तालुका समन्वयक यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत आपल्यालाच काही माहिती नसल्याची भूमिका घेतली .मग मंजूर दाव्याची रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल किंवा नाही हे सांगायला जबाबदार माध्यम देखील कंपनीकडून नेमण्यात आले की नाही हा ही प्रश्न निरोत्तरित आहे.
लवकरच हा प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं विमा मिळवून देऊ असे आश्वासन वंचित च्या वतीने देण्यात आले आहे.


