दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:जुन्या वादाच्या कारणावरून देगलूर येथील भायेगाव रोडवरील जिल्हा परिषद शाळेसमोर भुतनहिप्परगा येथील रहिवाशी हेमंत पाटील यांना मारहाण झाली होती त्यामध्ये मयत यांच्या छातीमध्ये व पोटात गंभीर दुखापत झाल्याने जिल्हा रुग्णालय नांदेड येथे उपचार सुरु होते.
दि. ०७ जुलै २०२२ रोजी उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात हेमंत पाटील यांचा मृत्यू झाला. सदरील घटनेविरोधात मयत व्यक्ती यांच्या मुलाकडून भारतीय दंड संहिता कलम ३०२, २९४ व ३४ नुसार पोलिस ठाणे नांदेड येथे गुन्हा दाखल झाला होता त्यावरून सदरील घटनेतील आरोपी नामेजिवनराव यादवराव रा. भुतनहिप्परगा ता. देगलूर वइतर दोन आरोपी यांना पोलिसांनी अटक केली होती व सदरील आरोपी विरोधात सत्र न्यायालय बिलोली येथे दोषआरोपपत्र दाखल करण्यात आला आहे. आरोपी जिवनराव यादवराव पाटील यांनी अॅड. संकेत शांताराम पाटील पळणीटकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जामीन अर्ज दाखल केले होते त्यामध्ये दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर दि. ०७ जानेवारी २०२३ रोजी मा. न्यायमुर्ती एस. जि. मेहरे यांनी पन्नास हजार रुपयाच्या जातमुचलक्यासह आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी आरोपीतर्फे अॅड. संकेत शांताराम पाटील पळणीटकर (वझर) यांनी काम पाहिले तर त्यांना अॅड. अभिजित पखे, अॅड. निलेश पाटील काळे, अॅड. आशिष बारवालर यांनी सहकार्य केले.


