दैनिक चालु 3
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर शिवसेने सोबत युती करणार असल्याचा चर्चा रंगल्या होत्या, मात्र यावर प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबतच्या युतीला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचा आरोप केला होता.
आता या आरोपावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शरद पवार पत्रकरांशी बोलतांना म्हणाले,’रिपब्लिकन पक्षातील काही गटांना आम्ही सोबत घेणार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय झालेला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शरद पवार यांचा आंबेडकर यांच्या महाविकास आघाडीत येण्यास विरोध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले,’विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्रित पावलं टाकावी हा आमचा महाराष्ट्रापुरता प्रयत्न आहे. काही राजकीय पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षातील काही गटांचा आघाडीत समावेश करावा, अशी इच्छा आहे. आम्ही चर्चेच्या स्थितीत आहोत. अंतिम निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही अनेक प्रश्नावर एकत्रित निर्णय घेतो. उद्याच्या निवडणुकीसाठीही एकत्रित भूमिका घ्यायला काही अडचण येणार नाही.’ असं शरद पवार म्हणाले.


