
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
कंधार—- महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी संगीता ज्ञानेश्वर माळगे यांच्या सह इतर ११ शिक्षक एकता पॅनलचे संचालक विजयी झाल्याबद्दल त्यांचं प्रतिनिधी महाराष्ट्र शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष बाबुराव फसमले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार यांनी सत्कार करण्यात आला .यावेळी राज्य उपाध्यक्ष जी .एस . मंगनाळे, विभागीय मुख्य संघटक युसुफ शेख, उच्च श्रेणी मुख्याध्यापक सी.डी कांबळे , तालुकाध्यक्ष मोबीन शेख, शिक्षक संघाचे तालुका उपाध्यक्ष डी. एन.मंगनाळे, एस.जी.केंद्रे, एम. एस .केंद्रे, आदी उपस्थित होते.