
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
लोहा – खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक व अत्यंत जवळचे विश्वासु सहकार्य तथा भारतीय जनता पार्टीचे लोह्याचे सरचिटणीस बाळु उर्फ गंगाधर पाटील पवार यांचा वाढदिवस लोहा शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यात्मीक क्षेत्रात गुरूवर्य श्री ह भ प ज्ञानोबा माऊली महाराज मुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करणारे व नांदेडचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा शहरासह ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीचे पक्ष मजबुती करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे लोह्याचे भाजपा सरचिटणीस बाळु पा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आई ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसाच्या दिवशी डोळ्यांचे मोफत मोतीबिंदू व ऑपरेशन शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या शिबीरात 273 रूग्णांनी या शिबीरात आपली नोंदणी करुन सहभाग घेतला व विशेष म्हणजे या शिबीरात 43 व्यक्तींची नांदेड येथे नेऊन मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. अशी माहिती लोहा येथील आई ऑप्टिकलचे संचालक तथा नेञ चिकित्सक डॉ चंद्रकांत पाटील मोरे कारेगांकर यांनी दिली .
दरवर्षी आशा प्रकारे कोणते ना कोणते उपक्रम भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस बाळु पा पवार आपल्या जन्मदिनी आयोजन करुन सामाजिक कार्यात सहभाग घेऊन आपला वाढदिवस साजरा करतात.