
दैनिक चालु वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:राम चिंतलवाड
राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त शहरातील श्री परमेश्वर मंदिर काम्पलेक्स येथे दिनांक१२जानेवारी२०२३रोजी दुपारी दीड वाजता कार्यक्रम आयोजीत करण्यातआले होते.या कार्यक्रमांसाठी विविध सामाजिक,राजकीय,शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख मान्यवरअभिवादन करण्यासाठी यावेळी उपस्थित होते.डॉ.गणेश कदम पाटील डोल्हारीकर व विलास वानखेडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व पुष्पगुच्छ वाहुनअभिवादन केले.तर यावेळी संजयभाऊ ठाकरे,बालाजी पांचाळ, मुन्ना भाऊ शिंदे जिल्हा उपाध्यक्ष मराठा साम्राज्य संघ नांदेड,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण डांगे,धोंडोपंत बनसोडे पत्रकार,देवानंद गुंडेकर संपादक,अनिल नाईक पत्रकार,प्रशांत ढोले यासह अनेक युवा कार्यकर्ते,शिवप्रेमी,शिवभक्तांनी प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र जाहीर अभिवादन करण्यातआले.