
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नायगाव:-नायगाव जिल्हा नांदेड येथील मातोश्री कै. सौ. केवळबाई मिरेवाड राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिकृतीना देण्यात येतो. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून पुरस्कारासाठी प्रवेशिका मागवण्यात येत आहे. दि.१ जानेवारी-२०२२ ते ३१ डिसेंबर-२०२२ या कालावधीतील प्रकाशित झालेले पुस्तके कविता, कथा, कादंबरी व बालसाहित्य (बालसाहित्यात सर्व प्रकारातून एकच पुरस्कार) पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती, व अल्पपरिचय सोबत पाठवावा.
सदर पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दोन हजार रूपये रोख ,सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र असे राहिल. तसेच नांदेड जिल्ह्यातील दोन साहित्यिकांच्या कलाकृतीस स्थानिक पुरस्कार देण्यात येईल .
इच्छुकांनी आपले साहित्य.
साहित्यिक वीरभद्र मिरेवाड ,व्यंकटेश नगर स्वामी समर्थ मंदिराजवळ नायगाव ता. नायगाव जि. नांदेड पिन 431709
या पत्यावर, दिनांक-30 एप्रिल 2023 पर्यंत पाठवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्काराची नियमावली खालील प्रमाणे मराठी कविता,कथा,कादंबरी,
बालसाहित्य प्रकारांना पुरस्कार देण्यात येईल.
सदर स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
हे पुरस्कार पहिल्या आवृत्तीस दिला जाईल ,दुसरी आवृत्ती पाठवू नये.
साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल-2023ही आहे. यानंतर आलेल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी स्विकारल्या जाणार नाही.
पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका पाठविणे विनामूल्य आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ निश्चित केले जाईल.तसे कळविले जाईल.
पुरस्कार विभागून मिळाल्यास पुरस्कार रक्कम विभागण्यात येईल.
पुरस्कारासंबंधी वेळेमध्ये बदल करण्याचे किंवा इतर काही नियोजनाच्या संदर्भातील अधिकार संयोजन समितीकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्यास पुरस्कार प्राप्त लेखकांची उपस्थिती अनिवार्य आहे किंवा प्रतिनिधी पाठवू शकता.संपर्कासाठी
वीरभद्र मिरेवाड (9158681302)