
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर – मानव विकास मिशन योजने अंतर्गत 0 ते 5 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या विद्यार्थीनींना त्यांचे 12 वी पर्यंत चे शिक्षण अखंडितपणे सुरु राहावे या उद्देशास्तव मोफत सायकलीचे वाटप केले जाते. त्या अनुषंगाने सरस्वती माध्यमिक विद्यालयात टाटा स्ट्रायडर कंपनीच्या एकूण 34 सायकलीचे वाटप देगलूर पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक (PSI) सुश्री . पुनम मोहनराव सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकमाध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष प्रताप शिवाजीराव देशमुख शिळवणीकर , कोषाध्यक्ष आकाश प्रतापराव देशमुख शिळवणीकर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक राठौर शैलेंद्र यांनी मांडले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक पिनाटे मोहन यांनी केले . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभहान शहापूरकर ,सर्व शिक्षकवृंद ,शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .