
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-श्री लोकमान्य शिक्षण संस्था विजोरा तालुका वाशी संचलित बेलेश्वर विद्यालय पखरुड येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भगतसिंग अकॅडमी चे संचालक श्रीकांत चव्हाण,प्रताप चव्हाण ,माजी सैनिक वरबडे नाना उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर तर यावेळी प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी शाळेतील सहशिक्षक भोसले एस जी यांनी राजमाता जिजाऊ आणि युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे विचार विद्यार्थ्यासमोर व्यक्त केले. यावेळी सहशिक्षक काळे एल एस सहशिक्षिका आवारे मॅडम यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक कुलकर्णी बी के केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठ सहशिक्षक बुटे एस जे यांनी केले तर आभार मुंडे बी एन यांनी मांडले.