
दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. नांदेड शहरात गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल असलेले श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड येथे विविध उपक्रम राबविले जातात त्यात सण , उत्सव , महापुरुषांचे जयंती सोहळे प्रामुख्याने साजरे केले जातात त्याच अनुषंगाने दि.23 जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. . याप्रसंगी श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माननीय सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे यांच्या हस्ते सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड ( जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना नांदेड ) , शालेय समिती सदस्य माननीय सूर्यकांत कावळे यांच्याही वतीने पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. . विशेष बाब म्हणजे मराठवाडा शिक्षक संघाचे अधिकृत बिनविरोध उमेदवार माननीय सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांनीही याप्रसंगी त्यांच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून सुभाष चंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. . या जयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्री शिवाजी हायस्कूल माणिक नगर ,नवीन कौठा नांदेड च्या विद्यार्थ्यांनी सुभाष चंद्र बोस आणि हिंदु-हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात विविध विषयांची भित्तिपत्रके तयार करण्यात आली होती त्या भितीपत्रकाचे उद्घाटन हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधीर भाऊ कुरुडे तसेच पर्यवेक्षक श्री सदानंद नळगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच भरपूर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले विचार मांडले. . या कार्यक्रमास श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज माणिक नगर , नवीन कौठा नांदेड चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा प्राध्यापक बंधू आणि भगिनी तसेच हायस्कूल व जुनिअर कॉलेजचे विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय स्वरूपाची होती