वडेट्टीवार म्हणाले; लहान वयातील बाल्या…
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा ‘लाल्या’ असा उल्लेख केला आहे.
जरांगे पाटील म्हणाले, “दिल्लीचा लाल्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना सांगतो की मराठ्यांना लक्ष्य करा. त्यानुसार विजयी वडेट्टीवार व त्यांच्यासारखे नेते महाराष्ट्राच मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. मराठा आरक्षणाविरोधात मोर्चे काढत आहेत.”
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विरोध केला आहे. या शासन निर्णयाविरोधात वडेट्टीवार यांनी ओबीसी आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र ही आंदोलनं राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून होत असल्याचा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. यासह त्यांनी राहुल गांधीचा ‘लाल्या’ असा उल्लेख केला. तर, मनोज जरांगे हे लहान वयातील ‘बाल्या’ आहेत, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी जरांगे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘जशी बुद्धी, तशीच वृत्ती’ असं म्हणत वडेट्टीवारांनी टोला लगावला.
मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “ओबीसींच्या आंदोलनाच्या नावाखाली विजय वडेट्टीवार यांना राजकारणात स्थिरावायचं आहे. दिल्लीचा लाल्या त्यांना सांगतो की मराठ्यांना टार्गेट करा. परंतु, त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कालपासून विदर्भात त्याचे परिणाम उमटू लागले आहेत. विदर्भातून संदेश येत आहेत. ओबीसींच्या नावाखाली काँग्रेस मोर्चा काढणार आहे. विजय वडेट्टीवार ओबीसींच्या नावाखाली राजकारणात स्वतःच बस्तान बसवू पाहात आहेत. त्या बदल्यात मराठ्यांना अंगावर घेत आहेत. विदर्भातील मराठे व कुणबी त्यांना दणका देतील. आरक्षणाच्या विरोधात जाणाऱ्यांना हिसका दाखवण्यास सुरुवात झाली आहे.
विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर
दरम्यन, मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “मनोज जरांगे हा लहान वयातील बाल्या आहे. त्यांना तसेच शब्द कळतात असा या सगळ्याचा अर्थ होतो. जशी त्यांची बुद्धी तशी त्यांची वृत्ती. ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे बोलतात. ते बालिश बुद्धी आहेत. बाल्याला दुसरा कुठला शब्द सुचणार ?
