
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील पाथरूड येथील आपुलकी वस्तीगृहास भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त एक हात मदतीचा एक अभिनव उपक्रम राबविला असून,औचित्य साधत आपुलकी वस्तीग्रहला मदत करण्यात आली. वस्तीग्रह मध्ये अनाथ विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो, तसेच शासनाचे कुठलेही अनुदान नसताना हे वसतिगृह चालवले जाते. वाढदिवसाचे औचित्य साधून बाळासाहेब क्षीरसागर यांच्या सूचनानुसार हार, फेटा, केक अशी खर्च न करता समाज उपयोगी कार्यासाठी मदत करावी असे आव्हान केले होते. त्यानुसार आपुलकी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी गहू, तांदूळ प्रत्येकी १०० किलो, एक महिन्याचा लागणारा किराणा विद्यार्थ्यांसाठी देण्यात आला.तसेच ग्रामीण रुग्णालय भूम येथे रुग्णांसाठी फळ वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर दीपक रामगुडे, ह भ प हरिदास महाराज पाथरूड कर, अध्यक्ष महादेव वडेकर ,जनसेवा बँकेचे संचालक अंगद मुरूमकर ,संतोष सुपेकर बाबा वीर ,रोहन जाधव, चंद्रकांत मासाळ, हेमंत देशमुख, संतोष अवताडे ,प्रदीप साठे, मेहबूब शेख, रोहिदास भोसले, बंडू भोसले ,वसुदेव बोराडे, महेश गजरे ,गजेंद्र धर्माधिकारी, गणेश फाळके, रमेश देशमाने ,समाधान बोराडे, आपुलकी वस्तीग्रहाचे व्यवस्थापक राजेंद्र दरंदले उपस्थित होते.वस्तीगृहाच्या वतीने अंगद मुरूमकर व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर दीपक रामगुडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक वस्तीग्रह चे व्यवस्थापक राजेंद्र दरंदले यांनी केले, तर आभार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष महादेव वडेकर यांनी व्यक्त केले.