
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा येथील आरोग्य उपकेंद्र गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा ग्रामस्थ प्रदिप गिलबिले, निलेश गिलबिले, अक्षय पाटील यांनी तक्रार केली आहे.त्यामुळे हजारो रहिवाशांचे हाल होत आहेत. उपकेंद्रा मध्ये अद्याप कोणतीही यंत्रणा नसल्याने गरोदर महिला व बालकांसाठी आवश्यक असलेल्या एमसीटीएस (मदर अॅण्ड चाईल्ड ट्रॅकिंग सिस्टम) क्रमाकांसाठी कुठे जावे, हा मोठा प्रश्न आहे.
आष्टा येथील उपकेंद्र बऱ्याच वर्षांपासूनचे आहे. या उपकेंद्रांतर्गत लसीकरण,एमसीटीएस क्रमांक देणे आदी कामे केली जात होती.प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र हे ग्रामीण भागातील कणा असुन तोच आरोग्य कर्मचारी नसल्याने आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली असल्याचे नागरीक त्रस्त झाले आहेत. आरोग्य विभागामार्फत या उपकेंद्रास कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करून गावातील नागरिकांचे होणाऱ्या हाल सोडवावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.