
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आडगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सचिन पाटील बोलताना म्हणाले जिल्हा परिषद शाळांनी असेच कार्यक्रम ठेवले पाहिजे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्टेजवर येतील लहानपणापासून स्टेजवर आल्याने ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठलीच भीती राहणार नाही आणि येत्या काळामध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी जिल्हास्तरीय महाराष्ट्रस्तरीय कला क्रीडा मध्ये भाग घेऊन आपला ग्रामीण भागातील ठसा उमटवतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व स्टॉप चे शालेय समिती व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन असेच कार्यक्रम ठेवत चला आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत मुले हे चिखलाच्या गोळ्या सारखे असतात त्यांना जसा आकार दिला तसे बनतात .जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ ने मागील आठ दिवसापासून अथक परिश्रम घेऊन सर्व विद्यार्थ्यांना भाषण कला लेझीम पथक खूप मोठे शिक्षण अवघ्या आठ दिवसांत तयार करून केले आपली शाळा ही एक मंदिरच आहे येथुन च आपण शिकलो मोठे झालो शाळेला गावाचा आधार ,गावाला शाळेचा आधार या म्हणीप्रमाणे आपण सर्व गावकरी मंडळींनी एकत्र येऊन आपली शाळा डिजिटल करण्यासाठी काम केले तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपली शाळा प्रथम असेल असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी व शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड साहेब सह शिक्षक मंगनाळे सर, गिजे सर, पुरी सर, कदम सर, कोंडे सर, गोणारे सर आदी गावांतील मंडळी उपस्थित उपस्थित होते..