
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – महाविकास आघाडी व मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री. विक्रम वसंत काळे यांच्या प्रचारार्थ लोहा – कंधार तालुक्यातील शाळांमध्ये शिवसेना नेते तथा लोहा कंधार मतदार संघाचे माजी आमदार रोहिदासजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल लोहा , ञिमुर्ति विद्यालय उस्मानगर , संत गाडगेबाबा विद्यालय कलंबर , जिल्हा परिषद हायस्कूल कलंबर , गणपतराव विद्यालय किवळा , शिवाजी माध्यमिक विद्यालय लोहा , कै विश्वनाथ नळगे विद्यालय लोहा , सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल पारडी , शिवाजी विद्यालय सोनखेड , जिल्हा परिषद हायस्कूल वडेपुरी , सह तालुक्यातील आदी शाळांमध्ये शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहून शिक्षक बांधवांशी संवाद साधत विक्रम वसंतराव काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. शिक्षक बांधवांच्या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम विक्रम काळे यांच्याकडून होईल असे मत यावेळी शिवसेना नेते माजी आ रोहिदासजी चव्हाण यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना व्यक्त केले
महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षांनी शिक्षण आणि शिक्षक यांच्या उन्नतीसाठी भरीव कामगिरी केलेली आहे. शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे कार्य आघाडी सरकारच्या काळात झालं. शिक्षक भावी पिढीच्या कर्तृत्वाचा पाया घडवत असतो. त्यामुळे शिक्षकांकडून ज्ञानदानाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते. त्यामुळे शिक्षक बांधवांच्या सर्व प्रश्नांना आवाज देण्याचे कार्य श्री. विक्रम काळे यांच्याकडून होईल हा मला विश्वास आहे. असे मत माजी आमदार तथा शिवसेना नेते रोहिदास चव्हाण यांनी यावेळी केले