
दैनिक चालु वार्ता खंडाळी प्रतिनिधी-संतोष भसमपुरे
अहमदपुर तालुक्यातील मौजे धसवाडी येथील ग्रामपंचायतीचा मागच्या पाच वर्षातील भोंगळ कारभार गावातील नागरीकांच्या सतर्कतेमुळे ऊघडकीस आला असुन,शासकीय गहाळ अभिलेखाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश अहमदपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आंदेलवाड यांनी दिले. त्यामुळे एकच खळबळ उडालीआहे
या बाबत सविस्तर माहीती अशी की,धसवाडी येथील ग्रामस्थ श्री परमेश्वर श्यामराव पोले व संतोष ज्ञानोबा भसमपुरे यांनी धसवाडी ग्रामपंचायतीचा शासकीय अभिलेख नष्ट झाल्याची लेखी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती . यानिमित्ताने अनेक प्रश्न गावकर्यांनी उपस्थित केले आहेत.मागील पाच वर्षात येथील नागरीकांना शासकीय योजनेचा कुठलाच लाभ मिळाला नाही.घरकुल योजनेच भ्रष्टाचार झाल्याने गावातील तरूणांनी पंचायत समितीसमोर काही दिवसापुर्वी ऊपोषन केले होते.यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शासकीय अभिलेख गायब होतोच कसा? शासकीय अभिलेख गहाळ झाली की, नष्ट केला? संबधीतावर प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.
————————————————-