
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर ;प्रतिनिध)आज दि.२६/०१/२३ प्रजासत्ताकदिनी निमीत्ताने परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री डॉ. सुरेंद्रभाऊ आलूरकर (केंद्रीय अध्यक्ष भा.शि. प्र.सं. अंबाजोगाई.) प्रमुख उपस्थिती मा. श्री प्रकाशजी चिंतावार (कार्यवाह स्थानिक समिती)प्रा.गिरीश वझलवार (उपाध्यक्ष स्थानिक समिती) मा. श्री गिरीशजी गोळे( सहकार्यवाह स्थानिक समिती), मा. श्री डॉ. विनायक मुंडे, मा. श्री राजाभाऊ कदम (तहसीलदार देगलूर ), मा. श्री लक्ष्मणराव कंधारकर मा. श्री गणेशजी अचिंतलवार कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ ,शाल देऊन सत्कार करण्यात आले. प्रास्ताविक व परिचय विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगांवकर यांनी सादर केले. यात त्यांनी विद्यासभा तसेच अभ्यासपूरक या मंडळाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे, विविध कार्यक्रमांचे, विद्यार्थी गुणदर्शक कार्यक्रमांची थोडक्यात ओळख उपस्थित मान्यवरांना व पालकांना प्रास्ताविकेतून सांगितले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनींच्या समूहाने गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु मंत्र आहे आगळा हा स्वागताचा सोहळा.…हे स्वागत गीत सादर केले. यानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांचे मनोगत झाले. यात मा. विनायक मुंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा विकास हा त्याच्या सामाजिक मानसिक व शारीरिक अशा तिन्ही अंगाने होत असतो. यासाठी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे. यानंतर मा.राजाभाऊ कदम यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयत्नशील असावे विविध कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवावा व नाविन्यता पूर्ण कार्य करण्यासाठी नेहमी तत्पर असावे व तसेच शाळेचे व शाळेतील शिक्षक वृंदांचे त्यांनी कौतुक केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सुरेंद्रभाऊ आलूरकर यांनी सांगितले की,वार्षिक स्नेह संमेलनातून विद्यार्थी हेरले जातात. यातूनच विद्यार्थी घडतो.यानंतर सचिन जाधव उपस्थित मान्यवरांचे, उपस्थित सर्व पालकांचे व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकाचे आभार मानले.
यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नृत्य सादरीकरण करण्यात आले. यात प्रथम श्री गणेशाचे गीत सादर करण्यात आले तसेच प्रत्येक वर्गातून विविध जाती धर्मातील लोक आपला आनंद, आपला उत्साह व आपल्या भावना कशाप्रकारे व्यक्त करतात हे विविध गाण्यांमधून व नृत्यांमधून विद्यार्थ्यांनी सादर केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी व पालकांनी टाळ्यांच्या गजरातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी व सविता बेजगमवार यांनी केले.