
दैनिक चालु वार्ता रायगड / म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
माणगांव – भारतीय संविधान म्हणजे फ़क्त कायद्याचे पुस्तकं नाही तर दैनंदिन जीवन जगण्याची मार्गदर्शक वाहिवाट आहे. प्रत्येक भारतीयला सध्या सोप्या भाषेत संविधान समजावून सांगायचा विचार घेऊन नूरखान पठाण, विलास पवार, विनयकुमार सोनवणे यांच्या पुढाकारातून संविधान गुण गौरव समिती निर्माण झाली.
2021 ला 26 नोव्हेंबर संविधान स्वीकृत दिन निमित्त राज्य स्तरीय ऑनलाईन संविधान गौरव परीक्षा घेण्यात आली.
2022 मध्ये लहान गट, मोठा गट आणि ऑनलाईन गट अश्या तीन गटात नूरखान पठाण लिखित आपले संविधान या पुस्तकावर आधारित संविधान गुण गौरव परीक्षा 26 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील 32 जिल्यात 122 परीक्षा केंद्रावर एकाचं वेळी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. आणि काल ना. म. जोशी विद्यालय गोरेगाव येथे या स्पर्धे चा राज्य स्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
माणगांव चे गट विकास अधिकारी वाय. एम प्रभे, माणगांव गट शिक्षण अधिकारी खरात मॅडम, सामाजिक कार्यकर्ते संदेश कुलकर्णी, गोरेगाव चे पोलीस निरीक्षक साहेब यांच्या प्रमुख उपास्थितीत आणि हजारो मान्यवऱ्यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनयकुमार सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन महाजन सर यांनी आली विलास पवार यांनी उपास्थिताचे आभार व्यक्त केले..
मनोगतात नूरखान पठाण यांनी या परीक्षे मागील भूमिका आणि येत असणारे अनुभव सांगितले. आणि येता काळात गावोगावी संविधान समजून घेऊन जगणारे संविधान प्रचारक निर्माण करण्याची गरज असून त्या दृष्टीने आपण कामं करणार असल्याचे सांगितले.
यावेळी मोठया गटातून ज्योतीताई क्षीरसागर ( पनवेल ) यांचा तर लहान गटातून सुद्धा पनवेल चीं विद्यार्थिनी रोशनी पाटील यांचा प्रथम क्रमांक आला. यावेळी या स्पर्धे साठी केंद्र प्रमुख म्हणून कामं केलेल्या संविधान प्रेमी केंद्र प्रमुख यांचा देखील सन्मान करण्यात आला