
दैनिक चालु वार्ता रायगड /म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून म्हसळा तालुक्यातील आदर्श शाळा खरसई मराठी या प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थी सन 2002 सातवी ची बॅच
या बॅचने शाळेला आवश्यक असे प्रोजेक्टर आणि स्पिकर भेट दिले या वेळी या बॅच चे प्रतिनिधी इंजिनिअर रमेश शितकर (अष्टपैलू गायक), अॅडोकेट सुनंदा पाटील, प्रितम पयेर, महेश शितकर, काशिनाथ उपकारे, प्रशांत पयेर,प्रभावती शितकर यांनी उपस्थित राहुन भेट दिले. यावेळी या माजी विद्यार्थी यांचे स्वागत शाळेचे उपशिक्षक सानप सर यांनी केले. उपस्थित टिमचे शाल व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री बालाजी राठोड सर यांनी सत्कार केला. आभार बेटकर सर यांनी मानले . सोबत सहशिक्षक शेबाळे सर, मडावी सर उपस्थित होते.यामध्ये शाळेचे एकुण ४० विद्यार्थ्यांनी आर्थिक सहकार्य करून शाळेला भरभरून सहकार्य केले. काही पुढील महिन्यात एकत्रितपणे येऊन माजी विद्यार्थी शाळेला भेट देऊन स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करणार आहेत असे मनोगत व्यक्त केले. काही बालपणीच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.