
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- अहमदपूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संवाद ग्रुप अहमदपूर आणि पुरोगामी साहित्य परिषद अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26/ 1 /2023 रोजी संध्याकाळी 6=30 वाजता निमंत्रिताचे कवी संमेलन आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या दोन्ही कार्यक्रमाचे उद्घाट न महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय बाळासाहेब जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय शिवानंद हिंगणे साहेब, भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते माननीय गणेश दादा हाके, अहमदपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष माननीय अभय जी मिरकले, अजहर बागवान ,जावेद बागवान, माजी नगरसेवक भैय्या भाई भजेवाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते चंद्रशेखर भालेराव, सय्यद नबी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडाळीचे दादाराव पोळ होते तर कवी संमेलन आणि देशभक्तीपर गीतांचे अध्यक्ष महाराष्ट्राचे ख्यातनाम साहित्यिक विद्रोही कवी माजी प्राचार्य तुकाराम हारगिले हे होते.
उद्घाटकीय भाषणामध्ये माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी असे सांगितले की देशभक्ती पर गीतामुळे आणि कविता मुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि समाजामध्ये जागृती निर्माण होते. महापुरुषांच्या कार्यांची उजळणी होते आणि जाती-जातीमध्ये सलोखा निर्माण होतो. असे कार्यक्रम सतत होत राहिले पाहिजे आणि समाजातील सुजाण नागरिकांनी असे कार्यक्रम घडवून आणले पाहिजे.
मी संवाद ग्रुपचे फारूक मणियार शेख जिलानी शेख मेहबूब साहब शेख बाबू भाई रुईकर आणि पुरोगामी साहित्य परिषदेचे प्राचार्य वामन साबळे एन डी राठोड राजेंद्र कांबळे यांचे अभिनंदन करतो.
कवी संमेलनामध्ये कवी शिवा कराड, कवी विजय पवार ,कवी शमीयोदिन जागीरदार, कवी एन डी राठोड, माझी प्राचार्य तुकाराम हारगिले, कवी गणेश चव्हाण, रवी प्राध्यापक भगवान अमलापुरे, कवी वैजनाथ गीते, कवी मुरहरी कराड, कवी डॉक्टर अकबर लाला यांनी देशभक्तीपर, भारतीय संविधानावर , महापुरुषांच्या कार्यावर, शेतकरी राजांच्या हालअपेष्टावर आपल्या कविता सादर करून जनसमुदायां च्या टाळ्या घेतल्या तसेच राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सुरेल मैफिलीमध्ये रहीम खा पठाण गौरी पुणे महंमद अली म अशोक कोत्तापल्ले साक्षी सोनकांबळे राजेंद्र सोनकांबळे चंद्रशेखर भालेराव देवा मस्के सम्यका संतोष श्रावणे अक्षदा कांबळे आकृपे बालासाहेब शेख दस्तगीर भाई यांनी देशभक्तीपर गीते सादर करून श्रोत्यांचे मनमुराद मनोरंजन केले. कार्यक्रमा चे संचलन शिवा कराड यांनी केले तर कवी संमेलनाचे संचालन विद्रोही साहित्यिक एन डी राठोड यांनी केले.
दोन्ही कार्यक्रमाचे आभार शेख नाझीम आणि अहमद तांबोळी यांनी मानले