
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:-तालुक्यातील आष्टा-आष्टावाडी येथील ग्रापंचायत ने ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायतीची नवीन इमारत शासनाच्या विविध निधीमधून उभी राहिली आहे.१८ लाख रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या इमारतीचे लोकार्पण ग्रामविकास अधिकारी संजय केंद्रे, सरपंच सुनील जाधव, उपरपंच, सदस्य, ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले.तालुक्यातील आष्टा- आष्टावाडी या गावाला असलेल्या ग्रामपंचायतीचे कार्यालय हे अनेक वर्षा पासून बैठ्या व अंगणवाडी मध्ये तात्पुरते होते.अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते परंतु ,ग्रामपंचायतची विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी,सदस्य तसेच गावातील, समाजसेवक, समस्त ग्रामस्थ यांनी गेली दोन वर्षे अखंड मेहनत घेऊन नवीन इमारत कार्यालय साकारले आहे.
*७४ वा प्रजासत्ताक दिन,उत्साहाचं वातावरण; भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन*
दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि विद्या मंदीर हायस्कूल, जिल्हा प्राथमिक शाळा मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. सूचनेप्रमाणे सर्व विध्यार्थी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायत प्रांगणात उपस्थित होते.यावेळी लेझिम, भाषण, देश भक्ती गीते,सादर करण्यात आली.प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम जिल्हा स्तरीय आयोजित करण्यात आले या मध्ये कुस्ती, भालाफेक,असे विवीध अनेक भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या स्पर्धेमध्ये विजेत्यांना बक्षीस वितरण केले. तसेच गावातील परिसरातून सुंदर मिरवणूक काढण्यात आली.खाऊ वाटप करून कार्यक्रमचा शेवट केला.या वेळी आष्टा ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी संजय केंद्रे, सरपंच सुनिल जाधव ,उपसरपंच,ग्रा.सदस्य, शिक्षकवर्ग,पालक,शालेय समितीचे,अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सदस्य, सोसायटीचे चेअरमन, अंगणवाडी सेविका,आशा सेविका व समस्त आष्टा ग्रामस्थ, उपस्थित होते.