
दैनिक चालु प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
जिल्हाधिकारी विजय राठोड यांची उपस्थिती.
दिनांक 2 फेब्रुवारी वाटूर येथे ऑफ लिविंग आयोजित महा शेतकरी मेळाव्यास श्री श्री रविशंकर जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असणार आहे. त्यानिमित्ताने दिनांक 26 जानेवारी रोजी वाटुर येथील श्री श्री ज्ञान मंदिरात 200 लोकांचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, चिराग पाटील, प्रीतम गोसावी, अंकुश दादा भालेकर,मनु नंबोदरी, प्राचार्य खंदारे, विक्रम नाना माने, बद्रीनारायण खवणे,गजानन केसरखाणे, आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. माती आणि पाणी या दोन बाबी अतिशय शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या आहेत त्या अनुषंगाने आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून पुरुषोत्तम वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला जलतारा प्रकल्प हा दोन्ही बाबीसाठी उपयुक्त असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले .दरम्यान परतूर आणि मंठा तालुक्यातील सदोतीस गावामध्ये आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून जलसंधारणाचा नवीन प्रकल्प जलतारा हा अतिशय प्रभावीपणे परतूर आणि मंठा तालुक्यात राबविण्यात आला. यामुळे या माध्यमातून जवळपास 20 हजार शेत पुनर्भरणाची खड्डे निर्माण करून त्या माध्यमातून करोडो लिटर पाणी भूगर्भात मदत झाली आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीला आणि विहिरीला खूप मोठा फायदा या प्रकल्पामुळे झाला. या लाभार्थी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री श्री रविशंकर जी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. परतूर आणि मंठा तालुक्यातील दोनशे साधकांनी यावेळी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महा शेतकरी मेळाव्यास संपूर्ण मराठवाड्यातून साधकांनी तसेच शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी समन्वयक प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गजानन वायाळ, जय मंगल जाधव, विवेक काकडे,प्रकाश जाधव, प्रवीण सस्ते, मोरेश्वर बोराडे, भगीरथ दवणे,जलतारा टीम आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. तसेच जलतारा टीम यांनी परिश्रम घेतले.