
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील पत्रकार धम्मदीप भुसावळे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाल्याने त्यांच्या पश्चात कुटुंबीयांना सावरण्याच्या दृष्टीने शंकरनगर पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गौवर्धन बियाणे यांच्या हस्ते शिलाई मशीनची भेट देत सांत्वन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, बिलोली तालुक्यातील पत्रकार धम्मदीप सुरेश भुसावळे (३५) यांचे दीर्घ आजाराने ता.१३ जानेवारी रोजी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन चिमुकली मुले आहेत, घरातला कर्ता पुरुष अचानकपणे सर्वांना सोडून निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातल्या त्यात आपला एक पत्रकार आपण गमावल्याचा दुःखद भावना मनासी बाळगून शंकरनगर मराठी पत्रकार संघाचे पत्रकार शेषराव कंधारे, निवृत्ती भागवत, अशोक पाटील, आनंदा पाटील डाकोरे, व्यंकट शिनगारे, ज्ञानेश्वर पाटील तोडे, यशवंत मोरे, गंगाधर कांबळे, धम्मानंद भेदेकर , भास्कर भेदेकर, तानाजी शेळगावकर, सत्तार इनामदार, मनोहर मोरे वरील पत्रकारासह प्रा. माने यांनी आर्थिक मदत करीत त्यांच्या कुटुंबियांना ता.२७ रोजी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गौवर्धन बियानी यांच्या हस्ते शिलाई मशीन ची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी शंकरनगर, आदमपूर, अटकळी नायगाव येथील बरचसे पत्रकार उपस्थित होते.