
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कागणे कोचिंग क्लासेस कंधार येथे दिनांक 28 जानेवारी 2023 वार शनिवारी स्वंयशासन दिन साजरा करण्यात आला यामध्ये प्रा. परमेश्वर कागणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 10 वी च्या अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनातील सहभाग हा केवळ शिक्षक होण्याचा अनुभव देणारा नसून, भविष्याला आकार देणारी रूची, कला दर्शविणारे एक प्रतीक असते. मुख्याध्यापक, शिक्षक, लिपीक, सेवक व विद्यार्थी यांच्या तांत्रिक सुसंवादाची जाणीव निर्माण होते. स्वयंशासन हा एकदिवसीय अनुभव अन् आनंद वाढवणारा असतो. तसेच भविष्यात यशाची दिशादर्शक ठरतो म्हणून विद्यार्थ्यांनी ही आठवण आयुष्यभर जपतो.
या वेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच शिक्षक म्हणून भूमिका पार पाडताना जबाबदारीने ट्युशन चे कार्य उत्तम प्रकारे सांभाळले .
सायली मुंडे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले तर शिक्षक म्हणून कावेरी मुसळे, सानिका भुरे, शुभांगी कागणे, कुंतल पवार ,समीक्षा गायकवाड ,सुप्रिया लाडेकर ,युवराज पवार ,हरिओम गीते ,नागेश्वर कराळे ,अनिकेत राठोड ,वैशाली कंधारे, धनराज गाडेकर ,उबेद शेख ,नागेश कंधारे इत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
यावेळी स्वयंशासन दिनी सहभागी झालेल्या शिक्षकांचे मनोगत घेण्यात आले. अध्यक्ष म्हणून परमेश्वर कागणे सर होते . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बेग सर , माधव गोटमवाड सर, बालाजी कनकवळे सर , गोविंद कंधारे व केंद्रे मॅडम यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंतेश्वर कागणे सर यांनी केले तर आभार माधव गोटमवाड यांनी मानले.