
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा तथा राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू आज परभणीत आले आहेत. राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय ढाले-पाटील यांना प्रत्येकी पाच-पाच मते मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. असं झालं तर संबंध मराठवाड्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा पहिला शिक्षक आमदार राहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जसं आम्ही दिव्यांगासाठी अहोरात्र कार्य करीत आहोत किंबहुना तसंच कार्य शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी पर्यायाने शिक्षणासाठी करायचे आहे नव्हे ते आमचं ब्रिद वाक्यच राहिले जाणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले. प्रहार जनशक्ती पक्ष, दिव्यांनी संघटना प्रहार शिक्षक संघटना यांचे संयुक्त उमेदवार संजय ढाले-पाटील यांच्या विजयासाठी नियोजनबद्ध खेळी आखता यावी म्हणून बच्चू कडू यांनी काल परभणीत मुक्कामी थांबून कांही लोकाभिमुख असे प्रश्नही हाताळले
असल्याचे समजते. काल परभणीत घेण्यात पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी मौलिक मार्गदर्शन केले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बोलणे यांच्या कार्याचे कौतुक ही केले. त्या दरम्यान आ. बच्चू कडू यांनी शहरातील कस्तुरबा गांधी विद्यालयाला भेट देऊन तेथे कार्यरत शिक्षकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. मागील विस वर्षांपासून शिक्षक सेवेचे कार्य करीत असलेल्या शिक्षकांना तेथे अद्याप सेवेत कायम केलेले नसल्याने मी त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असे भरीव आश्वासन यावेळी माजी मंत्री या नात्याने दिले.
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यात लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाईल याची शक्यता आहे. त्या विस्तारात मलाही संधी मिळू शकेल असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्यानेच निर्माण केलेले दिव्यांगांसाठीचे मंत्रालय खाते मला मिळावे अशी मागणी राहील असे सांगून दिव्यांगांसाठीच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी असे स्वतंत्र खाते निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील नव्हे तर संपूर्ण जगात पहिले राज्य ठरले असल्याचे म्हणत त्यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.