
दैनिक चालू वार्ता डोंबिवली-गुरुनाथ तिरपणकर-
धागा अखंड विणूया कोष्टी समाज एक करुया या संकल्पनेतून राज्यामध्ये महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई हे चौंडेश्वरी मंदीरांना भेटी देऊन समाज बांधवांना भेटत आहेत.त्याच अनुषंगाने महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाने डोंबिवली येथील गणेश मंदिर संस्थानच्या लंबोदर सभागृहात डोंबिवली कोष्टी समाज मंडळाची सदिच्छा भेट घेतली.यावेळी कोष्टी समाज सेवा मंडळ’डोंबिवलीच्या वतीने अध्यक्षा सौ.अनिता वाघावकर,सेक्रेटरी सौ.जयश्री रोकडे,ट्रस्टी दत्तात्रय(नाना)तारळकर,ट्रस्टी सुर्यकांत कडुलकर यांनी महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते,सचिव दिलीप भंडारे,चौंडेश्वरी सहकारी सुतगिरणीचे माजी व्हाइस चेअरमन श्रीकांतराव हजारे,ट्रस्टी अरविंद तापोळे यांचे शाल,श्रीफळ,गुबालपुष देऊन स्वागत करण्यात आले. मंडळाच्या अध्यक्षा सौ.अनिता वाघावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते,ट्रस्टी अरविंद तापोळे,नाना तारळकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी अल्पोपहाराने खेळीमेळीच्या वातावरणात सदिच्छा भेटीची सांगता झाली.