
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड – अंगद कांबळे
म्हसळा -कोकण उन्नती मित्र मंडळाचे बॅरिस्टर ए.आर.अंतुले संस्थापित वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 14 ते 28 जानेवारी 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजनाने साजरा करण्यात आला.पंधरा दिवसाच्या कालखंडात दिनांक 17 जाने रोजी पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेत ग्रंथपाल प्रा.आर.एस.माशाळे यांनी पुस्तक प्रकाशन व्यवस्थापन कशा पद्धतीने केली जाते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनांक 18 जाने रोजी ‘कवयित्री शांता शेळके,’मराठी भाषा संवर्धन’विषयावर निबंध स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत अविनाश लोखंडे,किशोर वाघे,पायल बोरकर,साक्षी अंजार्लेकर,अपेक्षा मेंदाडकर,दिव्या पाटील,नुतन पायकोळी,शिवानी वर्मा या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.स्पर्धेत पायल अविनाश बोरकर प्रथम क्रमांक,साक्षी सुनील अंजार्लेकर द्वितीय,शिवानी श्रीनाथ वर्मा हीने तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले.मराठी भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत व्हायला हवी म्हणून मराठी वाडःमयाचा इतिहास या विषयातंर्गत प्रश्न मंजूषा स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेत मानसी जाधव,धनश्री मेंदाडकर,अमिषा म्हात्रे, निकिता देवल,हरेश बेडेकर,तृप्ती गायकर,ऋतूजा म्हात्रे,दिव्या पाटील,अपेक्षा मेंदाडकर,अविनाश लोखंडे,पायल बोरकर, साक्षी अंजार्लेकर,शिवानी वर्मा या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला या स्पर्धेत पायल बोरकर हीने प्रथम,दिव्या पाटील हीने द्वितीय व ऋतुजा म्हात्रे हीने तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले.सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.”कविता कशी लिहावी ” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.रिझवाना सय्यद यांनी काव्य लेखनासाठी आवश्यक शब्द संग्रह व कवी मनाची संवेदनशिलता विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनातील कविता उत्स्फूर्तपणे व्यक्त व्हावी याकरिता स्व-लिखित काव्यवाचना कवीसंमेलन आयोजित करण्यात आले या संमेलनात मराठी विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी काव्य लेखनातील कौशल्य समजावून सांगितले.विद्यार्थ्यांनी आपली कविता उत्स्फूर्तपणे सादर केली.दिनांक 27 जाने रोजी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले प्रदर्शनाचे उद्घाटन अश्विनीकुमार मेश्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी.ए.टेकळे प्रा.एम.एस.जाधव डाॅ.एस.यू.बेंद्रे,मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे समन्वयक प्रा.आर.एस.माशाळे,प्रा. के.एस.भोसले व बहुसंख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी घेतला.ग्रंथ प्रदर्शनात महत्वाच्या विषयावरील नामवंत लेखकाचे संदर्भ ग्रंथ आकर्षक पद्धतीने मांडण्यात आली होती दि.27 जाने रोजी अमराठी भाषकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे सांगता व प्रमाणपत्र वितरण समारंभ दि. 28 जाने रोजी पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी. ए.टेकळे यांनी भूषवले.या कार्यक्रमास प्रा.जाधव,डाॅ.बेंद्रे,प्रा. डाॅ.शिगवण हे उपस्थित होते.आयोजीत स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे समन्वयक प्रा.आर.एस.माशाळे यांनी केले.आभार प्रा.के.एस.भोसले यांनी मानले.