
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
शैक्षणिक गुणवत्तेसह विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अविरत अग्रेसर असणारी जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड या प्रशाळेत ७४ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दि.२८ जानेवारी रोजी कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते सदर सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगीकृत असलेल्या विविध कलागुणांतून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्यांचे सादरीकरण करुन प्रेक्षक,पालक व उपस्थितांची मने जिकंली. या नेत्रदिपक सांस्कृतिक कार्यक्रमाने मुखेडकर मंत्रमुग्ध झाले असुन कार्यक्रमास पालक व प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला.विद्यार्थ्यांचे जबरदस्त नृत्य पाहुन प्रेक्षक भारावून चिमुकल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख होते तर उदघाटक म्हणुन नायब तहसीलदार महेश हांडे,प्रमुख अतिथी म्हणून न.प.मुख्याधिकारी विजयकुमार पाटे,तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर, पोलिस उपनिरिक्षक भारत जाधव,सावरगाव येथील जि.प.हायस्कूलचे मुख्याद्यापक जी.सी.चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठलराव वडजे, केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड,सूर्यकांत दासरवार, डाॅ.शिवाजी कराळे,सोमनाथ कुंभार,श्रीपत वाडीकर, जि.प.हा.मुलीचे शाळेचे मुख्याध्यापक मारोती कांबळे, वैद्यकीय संस्थेचे सचिव डाॅ.पांडुरंग श्रीरामे,सरपंच हुल्लाजी पाटील शिंदे, संजय यलमवाड . शा.व्य.स.उपाध्यक्षा उर्मिला गिते यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे, सहशिक्षिका सविता उमाटे, सहशिक्षक श्यामसुंदर दारकु यांनी केले,प्रास्ताविक मुख्याध्यापक एम.आर.कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक दिपक लोहबंदे यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील तरगुडे, नंदकुमार काचावार,हणमंत पा.नरोटे,रूक्मिणबाई पंदिलवाड, श्रीदेवी पांचाळ,शिवमाला धर्मापुरे,सरदार बेगम पठाण,पुजा संगमवाड,लक्ष्मीबाई यलमवाड, अर्चना वाघमारे,रेश्मा उतकर, भवानीसिंह चौव्हाण,संतोष मठपती,अनवर अत्तार,गंगाधर घायाळे,गौतम गवळे,शिक्षक प्रतिनिधी दिपक लोहबंदे,अश्विनी कुलकर्णी यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.या सांस्कृतिक कार्यक्रमास शहर व तालुक्यातील पालक, विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे बहारदार नृत्य.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदना गिताने करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंगीलो मारो ढोल, शेतकरी गीत,सामी सामी, लावणीसह जलवा हे देशभक्तीपर गित,नारी शक्ती,शिवाजी महाराज,मल्हार मल्हार,देवीचा गोंधळ, गवळण,चंद्रा लावणी, कोळीगीत,फनी साँग,जन्म बाईचा,झुमकावाली अशा एकाहून एक सरस देशभक्ती पर गिते, लावणी,हिंदी व मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करीत उपस्थित नागरीक व पालकांची मने जिकंली. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम गीताने करण्यात आला.