
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर:तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नविन पक्षाची स्थापना केली असून या पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती पार्टी असून या पक्षाकडून विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात अनेक उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी महाराष्ट्राच्या लगत तेलंगाना राज्य असून तेलंगाना राज्यातील जुक्कलयेथील आमदार हणमंतराव शिंदे यांचे चिरंजीव हरिश हणमंतराव शिंदे हे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी हरिश हणमंतराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की मी हरिश हणमंतराव शिंदे शिक्षण (च. दशलह) झाले असून मी सद्या तेलंगाना राज्यात भारत राष्ट्र समिती पक्षाचा पदाधिकारी असून मी महाराष्ट्रातीलदेगलूर बिलोली मतदार संघातील अनेक गावांना भेटी देत त्याठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतली व येथील जनसामान्य जनतेला जो त्रास होत आहे व या भागातील माजी आमदार व आताच्या आमदारांकडून ज्या आश्र्वासनाची पुर्तता होऊ शकली नाही ती पोकळी मी भरून काढण्यासाठी प्रयत्न करीन व महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षाची सरकार आल्यास तेलंगाणा राज्यात जेवढ्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा या मतदारसंघात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जर माझ्या नावाचा विचार केला
मी तेलंगाना राज्यात केसीआर पक्षाने जेवढी सुविधा शेतकऱ्यांना दिली आहे त्या सर्व सुविधा देगलूर बिलोली मतदार संघातील मतदार बांधवांना देण्याचे आश्र्वासन देतो.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आमची सरकार सत्तेत आली तर देगलूर बिलोली मतदार संघात शेतकऱ्यांना चोवीस तास शेतीसाठी विज मोफत, शेतकऱ्यांना वर्षाला एकरी दहा हजार रुपये अनुदान, कल्याण लक्ष्मी (मुलीच्या लग्नासाठी एक लाख एकशे सोळा रुपये) योजना अशा अनेक योजना या मतदारसंघात राबविल्या जातील असे आश्र्वासन दिले.