
दैनिक चालू वार्ता बदलापूर- गुरुनाथ तिरपणकर–
दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाचा २१वा वर्धापनदिन रविवार दि.२९जानेवारी रोजी संजीवनी हाॅल,बदलापूर(पुर्व)येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आधार इंडिया ट्रान्सफाॅर्मेशन कौन्सिलचे उपाध्यक्ष डाॅ.अमित दुखंडे,सिंधुदुर्ग सहकरी बॅक लि.चे अध्यक्ष हरिष परब,प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्षा सौ.दिप्ती(प्रेरणा)गावकर-कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,सचिव मंगेश कदम,खजिनदार सुवर्णा कदम आदी पदाधिका-यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.मंडळाचे सचिव मंगेश कदम यांनी प्रास्ताविक केले.अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.उपस्थित प्रमुख पाहुण्यांची समोयचित मार्गदर्शनपर भाषणे झाली.यावेळी मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.तसेच बदलापुर मधील भारतातील पहीलेच माहेरघर”माहेरवाशिण”च्या संचालिका प्रभाताई शिर्के यांचा मंडळाच्या खजिनदार सौ. सुवर्णा कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थ्यीनींचा कौतुक सोहळा पार पडला.प्रमुख पाहुण्यांच्या मुलांना बक्षिसे देण्यात आली.महिलांसाठी हळदीकुंकु समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.पैठणी जिंका,लकी ड्रॉ मध्ये पाच भाग्यवंत महिलांना पैठणी प्रदान करण्यात आली.पैठणीसाठी मनसेच्या शहर अध्यक्षा संगिता चेंदवणकर यांचे विशेष सहकार्य लाभले.विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध टी.व्ही.कलाकार अभिजित प्रस्तुत”जादुई दुनिया”या जादुच्या प्रयोगांना कोकणवासियांचा उदंड प्रतिसाद लाभला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळाचे कार्याध्यक्ष महेश सावंत यांनी अतिशय खुमासदार व उत्कृष्टरित्या केले.शेवटी सुग्रास भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धापनदिनास रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.