
दैनिक चालु वार्ता,इंदापूर प्रतिनिधी -बापु बोराटे
तेजस इलेक्ट्रिकल पुणे या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अजय खराटे या युवकाने ३२ व्या जन्मदिनी पुणे(दिघी) येथील मातृछाया अनाथ आश्रम येथील मुलांबरोबर ३२ वा वाढदिवस साजरा केला.आश्रमातील मुलांना शालेय उपयोगी साहित्य,व खाऊ वाटप करण्यात आले.
अजय खराटे म्हणाले की, मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे आशिर्वाद मिळतील.
आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदतरुपी सेवा करुन त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहे.
यावेळी अजय खराटे यांच्या मातोश्री सुवर्णमाला खराटे, नाना परांडे,जाॅन,राज, महेंद्र पाटील,संजू, संतोष शिंदे, सचिन शहा आदी अजय खराटे यांचे सहकारी उपस्थित होते.