
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:-पोखरभोसी ता.लोहा येथे राष्ट्रीय जननी, राजमाता माँसाहेब जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले याच्या जन्मोत्सव निमित्त प्रसिद्ध व्याख्याते,शिव,फुले शाहू ,आंबेडकर ,अण्णाभाऊ साठे यांचे गाढे अभ्यासक ,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड केंद्राचे वक्ते शिवश्री रमेशजी पवार यांचे दिनांक ३१ जानेवारी रोज मंगळवार ह्या दिवशी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
पोखरभोसी ता. लोहा येथे दि.३१ जानेवारी रोज मंगळवार सायंकाळी ७.०० वाजता राष्ट्रमाता माॅ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मोत्सवानिमित्त व्याख्यानमाला, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवमती ज्योतीताई शिंदे (जि.प.प्रा.शाळा पोखरभोसी ) तर प्रमुख पाहूणे म्हणून मुख्याध्यापक शिवश्री हरि मुळे (जि.प.प्रा.शाळा पोखरभोसी ) सरपंच शिवमती मिरा कैलास गिरी यांची उपस्थितीती रहानार आहे.जन्मोत्स सोहळा निमित्त शालेय विद्यार्थ्यासाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना व शिष्यवृत्ती व १० वी मध्ये ९० टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्याचा आणि अंगणवाडी ताईंचा व वैद्यकीय महिला कर्मचा-याचा देखिल सन्मान करण्यात येणार आहे.तरी परीसरातील शिवश्री , शिवमती व विद्यार्थ्यांनी मोठ्या संखेने उपस्थित रहान्याचे आव्हान शिक्षक मित्रमंडळ पोखरभोसी यांनी केले आहे.